अखंड जया तुझी प्रीती
संत तुकाराम महाराज अभंग
अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
Youtube: Watch on Youtube
Nice Mauli.
ReplyDeleteअतिशय छान
ReplyDeleteHello Abhijeet,
ReplyDeleteThis is my favorite Abhanga too!
If you can, requesting to get complete meaning of this Abhanga in regular words in Marathi.
I understand some of the portion but can't get it entirely.
for e.g
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
Don't know what does this mean.
and
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
Not sure I understand this too.
तुम्ही आम्ही पिडोजेने म्हणजे जस वडील आणि मूळ मध्ये आई असते 2.ताक घुसलायची र इ असते तिला दोन्ही बाजूनी धरून फिरवायचे असते तसं
Deleteदोन्ही म्हणजे इथे तुकोबा राय सुख आणि दुःख ह्याबद्दल सांगत आहेत
Delete