वैष्णव घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ


नामदेव महाराज अभंग

वैष्णवा घरी सर्वकाळ | सदा झणझणती टाळ ||
कण्या भाकरीचे खाणे | गाठी रामनाम नाणे ||
बैसावयासी कांबळा  | द्वारी तुळसी रंगमाळा ||
घरी दुभे कामधेनु | तुपावरी तुळसीपानु ||
फराळासी पीठलाह्या | घडीघडी  पडती पाया ||
नामा म्हणे नेणती कांही | चित्त अखंड विठ्ठल पायी  ||

Watch Video:  Youtube link

Comments

Popular posts from this blog

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

झाली संध्या संदेह माझा गेला