झाली संध्या संदेह माझा गेला

संत एकनाथ महाराज अभंग 

झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं प्रगटला ॥धृ॥

गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । 
असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान हें मुक्तस्थिती ॥१॥

सद्बुद्धीचें घालूनि शुद्धासन । वरीं सद्गुरुची दया परिपूर्ण ।
 शमदम विभुती चर्चूनी जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥

बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।
 भक्ति बहिण धांवूनि आली गांवा । आतां संध्या कैसी करूं मी केधवा ॥३॥

सहज कर्में झालीं तीं ब्रम्हार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन । 
ऐसें ऐकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निजखूण ॥४॥

🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼

Watch Video: Click Here


Comments

Popular posts from this blog

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

वैष्णव घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ