विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
संत तुकाराम महाराज अभंग
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१
आइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ।।२।।
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वर पूजनाचें ।।३।।
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ।।४।।
🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼
जय जय रामकृष्ण हरी👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
आज चिंतनासाठी आलेला अभंग चार चरणांचा सुंदर असा समाज सुधारक म्हणून ऊपदेश करतांनाचा अभंग आहे. भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्य ही समाजाला लागलेली किड आहे, हे संतांनी तेव्हाच ओळखले होते. म्हणूनच वैष्णव धर्माला वेगळा जसा मुलामाच देऊन त्यांनी वारकरी सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. या सांप्रदायात कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. कोणी कोणाचा अधिकार हिरावून घेत नाही. *सकलांसी येथे आहे अधिकार* आणि नम्रता तर ईतकि, *एकमेका लोटांगणी जाती*
असा हा वैष्णव धर्म निर्माण करुन संतांनी समाजावर खुप खुप मोठे ऊपकार केले आहेत. त्याच वैष्णव धर्माचे मुळ, निती, परंपरा, पद्धति तुकाराम महाराज सदर अभंगातून स्पष्ट करीत आहेत.
*विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म।*
*भेदाभेदभ्रम अमंगळ॥*
ज्यांना अवघं जगच विष्णुमय आहे. या चराचरात तो भगवान ज्यांना दिसतो, असे हे वैष्णव जन. चराचरात जो देव आहे, तो तुमच्या आमच्यात असेलच ना..!! तो संतानी पाहिला, म्हणून एकमेकांच्या पाया पडण्याची पद्धत सुरु केली. मग तुमच्यातही तोच राम आहे जो माझ्यात आहे, मग तुझ्या माझ्यात फरक तो काय...?? म्हणजे भेदाभेद राहिला नाही. भेदाभेद नाही, सर्वाठायी तोच राम मग सगळं मंगळच...!! अमंगळ काही राहिलेच नाही...!! वैष्णवांचा धर्म सांगणारा नामदेव महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
*वैष्णवा घरी सर्वकाळ।*
*सदा झणझणती टाळ॥*
सदा विठ्ठल भजन गाणारे, ज्यांचे चित्त सदा विठूरायाचे पायी असते. असे असतांना त्यांना कमी तरी काय असणार...!! *तुझे पायी सुख सर्व आहे।*
पुढे तुकोबाराय म्हणतात,
*आईका जी तुम्ही भक्त भागवत।*
*कराल ते हीत सत्य करा॥*
मनूष्य जन्माचे हीत कशात आहे, तर भगवंताचे नामचिंतन करुन सर्व काही त्याचे पायी वाहण्यात. त्याने "अनंता जन्मीचा" शिण जातो. महाराज म्हणतात, हे भक्त भागवतांनो तुम्हीही असे हित करा कि तुमचाही जन्मोजन्मीचा शीण जाईल.
*कोणाही जीवाचा न घडावा मत्सर।*
*वर्म सर्वेश्वर पुजनाचे॥*
तुमच्यात जो राम आहे, तोच सर्वांत आहे. मग कोणाचा द्वेष, मत्सर करायचा तर तुम्ही त्याच्यातल्या रामाचा मत्सर करताय, हे पहिलं ध्यानात घ्या. तो तुमचा अधिकार नाही. तेव्हा कुणाचाही मत्सर करु नका. कोणाचं वाईट चिंतू नका. कोणाबद्दल अपशब्द वापरु नका. कोणाला फसवू नका. प्राणी मात्रांवर दया करा. तीच त्या सर्वसाक्षी परमेश्वराची खरी पुजा.
*तुका म्हणे एका जीवाचे अवयव।*
*सुख दु:ख जीव भोग पावे॥*
शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, आपण सर्व जीव या जगात प्रारब्ध भोगण्यासाठी हा देह धारण केला आहे. सुख दु:ख हेया देहासाठी आहेत. आत्म्याला भोग भोगण्यासाठी या देहाची व्यवस्था करण्यात आली आहे. राजाला शाप लागू नये म्हणून ज्याप्रमाणे एक एक धातूची मूर्ति पुढे करण्यात आली, त्याप्रमाणे. ( संदर्भ : नवनाथ भक्तीसार) आत्मा देहरुपाने काहीतरी पाप करतो आणि नंतर तेच पाप त्या किंवा दुसर्या देहाला ते भोगावे लागते. म्हणून सुख दु:ख हे निस्पृह भावनेने, म्हणजे हे मला नव्हे तर शरीराला भोग आहेत, आणि मी म्हणजे हे शरीर नाहीच, अशा भावनेने भोगावे. पण आपला वैष्णव धर्म सोडू नये, असा तुकाराम महाराज ऊपदेश करीत आहेत, असे मज पामराला वाटते.
झालेली चिंतनसेवा माऊलींचे चरणी अर्पण🙏🏻🙏🏻
ऊणे अधिक काही झाले असेल तर सांभाळुन घ्यावे, हीसंत सज्जनांचरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻
जयजय रामकृष्ण हरी👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
जयजय विठ्ठल रखुमाई👏🏻👏🏻🙏🏻

Comments
Post a Comment