अखंड जया तुझी प्रीती


संत तुकाराम महाराज अभंग

अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति ।
मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥
पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं ।
न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥
तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥
तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ।
आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥

Youtube: Watch on Youtube


Comments

  1. Hello Abhijeet,

    This is my favorite Abhanga too!

    If you can, requesting to get complete meaning of this Abhanga in regular words in Marathi.

    I understand some of the portion but can't get it entirely.

    for e.g
    तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें ।
    Don't know what does this mean.

    and
    आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥
    Not sure I understand this too.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही आम्ही पिडोजेने म्हणजे जस वडील आणि मूळ मध्ये आई असते 2.ताक घुसलायची र इ असते तिला दोन्ही बाजूनी धरून फिरवायचे असते तसं

      Delete
    2. दोन्ही म्हणजे इथे तुकोबा राय सुख आणि दुःख ह्याबद्दल सांगत आहेत

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

झाली संध्या संदेह माझा गेला

वैष्णव घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ