Posts

झाली संध्या संदेह माझा गेला

Image
संत एकनाथ महाराज अभंग  झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं प्रगटला ॥धृ॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।  असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान हें मुक्तस्थिती ॥१॥ सद्बुद्धीचें घालूनि शुद्धासन । वरीं सद्गुरुची दया परिपूर्ण ।  शमदम विभुती चर्चूनी जाण । वाचें उच्चारी केशव नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां ।  भक्ति बहिण धांवूनि आली गांवा । आतां संध्या कैसी करूं मी केधवा ॥३॥ सहज कर्में झालीं तीं ब्रम्हार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन ।  ऐसें ऐकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निजखूण ॥४॥ 🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼 Watch Video:   Click Here

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

Image
संत तुकाराम महाराज अभंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ।।२।। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ।।३।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।४।। 🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼 जय जय रामकृष्ण हरी👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻 आज चिंतनासाठी आलेला अभंग चार चरणांचा सुंदर असा समाज सुधारक म्हणून ऊपदेश करतांनाचा अभंग आहे. भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्य ही समाजाला लागलेली किड आहे, हे संतांनी तेव्हाच ओळखले होते. म्हणूनच वैष्णव धर्माला वेगळा जसा मुलामाच देऊन त्यांनी वारकरी सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. या सांप्रदायात कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. कोणी कोणाचा अधिकार हिरावून घेत नाही. *सकलांसी येथे आहे अधिकार* आणि नम्रता तर ईतकि, *एकमेका लोटांगणी जाती* असा हा वैष्णव धर्म निर्माण करुन संतांनी समाजावर खुप खुप मोठे ऊपकार केले आहेत. त्याच वैष्णव धर्माचे मुळ, निती, परंपरा, पद्धति तुकाराम महाराज सदर अभंगातून स्पष्ट करीत आहेत. *विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म।* *भेदाभेदभ्रम अमंगळ॥* ज्यांना अवघं जगच विष्णुमय आहे. य...

सुख या संतसमागमें

संत तुकाराम महाराज अभंग सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥ ह्मणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥ ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाहए अभ्यंतर मजजवळा ॥३॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तिमुक्ती जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥ जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका ह्मणे ॥॥ अर्थ : संतांच्या संगतीत रहाणे हे खरे सुख होय.साधूंच्या संगतीत सर्वांनी भगवंतांचे नित्य कीर्तन, भजन करावे. नामसंकीर्तनाने सर्व पापकर्मे नष्ट होतात, मनुष्य भक्तीप्रेमामध्ये सदैव डुलत रहातो. म्हणून आता मला कसलीच चिंता नाही, तूच आमचा माता,पिता आहेस. बहीण, बंधू, चुलता आहेस. सर्व नातीगोती तुझ्यातच आहेत. हे मी निश्चितपणे जाणले आहे की, तुला माझा विसर पडत नाही, तूच परमात्मा रुपाने माझ्या हृदयात राहून सदैव मला धीर देतोस. आत बाहेर तूच भरून राहि...

वैष्णव घरी सर्व काळ सदा झणझणती टाळ

Image
नामदेव महाराज अभंग वैष्णवा घरी सर्वकाळ | सदा झणझणती टाळ || कण्या भाकरीचे खाणे | गाठी रामनाम नाणे || बैसावयासी कांबळा  | द्वारी तुळसी रंगमाळा || घरी दुभे कामधेनु | तुपावरी तुळसीपानु || फराळासी पीठलाह्या | घडीघडी  पडती पाया || नामा म्हणे नेणती कांही | चित्त अखंड विठ्ठल पायी  || Watch Video:   Youtube link

अखंड जया तुझी प्रीती

Image
संत तुकाराम महाराज अभंग अखंड जया तुझी प्रीती । मज दे तयाची संगति । मग मी कमळापति । तुज बा नाणीं कांटाळा ॥१॥ पडोनि राहेन तये ठायीं । उगाचि संतांचिये पायीं । न मागे न करीं कांहीं । तुझी आण गा विठोबा ॥२॥ तुम्ही आम्ही पीडों जेणें । दोन्ही वारत्नी एकानें । बैसलों धरणें । हाका देत दाराशी ॥३॥ तुका म्हणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । आता न पाहिजे केला । अवघा माझा अव्हेग ॥४॥ Youtube: Watch on Youtube

ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा

Image
संत चोखा मेळा अभंग ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥ कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥ नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥ चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥ अर्थ:  ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा.डोंगा म्हणजे वाकडा तिकडा ऊस दिसतांना जरी वाकडा तिकडा दिसत असला तरी त्याचा रस मात्र गोडच असतो.  रसाची गोडी वाकडी-तिकडी नसते़.           म्हणून आपण वरवरच्या रंगाला भुलू नये.  फसू नये. रंग आणि आकार ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे बाहेरचे आवरण.ते अगदी वरवरचे स्तर आहेत. त्यालाच आपण फशी पडलो तर गाभ्यातल्या मूळ तत्त्वाशी आपली भेट होणार नाही.आपले मीलन होणार नाही.           म्हणून संत चोखा मेळा म्हणतात मी जरी वाकडा वाटले तरी माझा भाव भोळा, आहे सरळ आहे. Youtube:   Song:   Click to watch Explenation: Click to watch