विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

संत तुकाराम महाराज अभंग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।।१ आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ।।२।। कोणाही जीवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ।।३।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।४।। 🌼🌺🌸🌷🌹🌷🌸🌺🌼 जय जय रामकृष्ण हरी👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻 आज चिंतनासाठी आलेला अभंग चार चरणांचा सुंदर असा समाज सुधारक म्हणून ऊपदेश करतांनाचा अभंग आहे. भेदाभेद, स्पृश्य अस्पृश्य ही समाजाला लागलेली किड आहे, हे संतांनी तेव्हाच ओळखले होते. म्हणूनच वैष्णव धर्माला वेगळा जसा मुलामाच देऊन त्यांनी वारकरी सांप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. या सांप्रदायात कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. कोणी कोणाचा अधिकार हिरावून घेत नाही. *सकलांसी येथे आहे अधिकार* आणि नम्रता तर ईतकि, *एकमेका लोटांगणी जाती* असा हा वैष्णव धर्म निर्माण करुन संतांनी समाजावर खुप खुप मोठे ऊपकार केले आहेत. त्याच वैष्णव धर्माचे मुळ, निती, परंपरा, पद्धति तुकाराम महाराज सदर अभंगातून स्पष्ट करीत आहेत. *विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म।* *भेदाभेदभ्रम अमंगळ॥* ज्यांना अवघं जगच विष्णुमय आहे. य...